"तुमची क्षमता शोधा - क्षमतेचा उपयोग करा!"..

"From a small-town entrepreneur to a passionate mentor, I empower MSMEs to unlock their true potential and build sustainable financial success."

"माझा प्रवास: साधेपणापासून संघर्षाकडे"

मी विशाल एस. महाले, माझा प्रवास म्हणजे एक साधेपणात सुरू झालेला प्रवास, मेहनत, शिकण्याची भूक आणि सतत प्रगतीची ओढ. मी महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातील मध्यमवर्गीय कुटुंबातून आलोय. माझं शिक्षण नगरपालिकेच्या मराठी माध्यम शाळेत झालं, आणि दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं.

लहानपणापासूनच मला काम आणि आर्थिक स्वावलंबनाची किंमत कळली. शिक्षणासोबतच मी सलून काम शिकायला सुरुवात केली, ज्यामुळे मला स्वतःची आर्थिक स्थिती सुधारण्याची संधी मिळाली. हाच व्यवसाय मी Graduation पर्यंत चालवत होतो, ज्यामुळे लहान व्यवसाय कसा चालवायचा, हे शिकण्याची संधी मिळाली. या अनुभवाने मला एक वेगळं व्यावसायिक ज्ञान आणि संकटांशी लढण्याची ताकद दिली.

"वित्तीय क्षेत्रात प्रवेश: एक आकांक्षी Office Boy ते अनुभवी Account Manager"

Commerce मध्ये graduation पूर्ण केल्यानंतर, मला finance क्षेत्रात खोलवर उतरायची इच्छा होती. 2005 मध्ये मी एका chartered accountancy firm मध्ये office boy म्हणून ₹1,500 च्या पगारावर काम करायला सुरुवात केली. काम साधं होतं, पण मला या क्षेत्रातील प्रत्येक गोष्ट शिकायची होती. पुढील काही वर्षांत, मी office boy पासून senior accountant आणि office manager पर्यंतचा प्रवास केला. या काळात tax, accounting, corporate formation, project finance अशा अनेक क्षेत्रांतील ज्ञान मिळवलं. 2016 मध्ये मी माझ्या career ला नवा वळण देण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःचं tax consulting firm सुरू केलं.

"स्वतंत्रता आणि स्थिरता: माझं Consulting Firm"

या प्रवासात मी फक्त व्यवसायच नाही तर clients शीही जवळून ओळख झालो. माझ्याकडे 300+ MSME व्यवसाय आणि छोटे-मोठे व्यवसाय clients होते, ज्यांची विविध गरजा होत्या. या कामात मला एक महत्त्वाचा मुद्दा जाणवला: बहुतांश नवीन उद्योजक आणि व्यवसायांना त्यांच्या financial pillar वर काम करण्याचं महत्त्व ठाऊक नव्हतं. अनेकजण उत्साही होते, पण त्यांच्याकडे आर्थिक धोरणांचं स्पष्ट नियोजन नव्हतं, ज्यामुळे व्यवसायाचा विस्तार आणि आर्थिक स्थिरता साधण्यात त्यांना अडचणी येत होत्या.

"MSME व्यवसायांना दिशा: आर्थिक साक्षरतेचा अभाव"

ही जाणीव मला MSMEs साठी एक ठोस financial structure तयार करण्याच्या दिशेने नेली. मी याचा सखोल अभ्यास केला आणि याचं तंत्रज्ञान, project finance आणि वास्तुशास्त्र या क्षेत्रांमध्ये उतरण्याचं ठरवलं. मी निर्णय घेतला की या व्यवसायांना एका मजबूत financial pillar ची गरज आहे, जो त्यांच्या growth चा आधार बनेल. फक्त आर्थिक मार्गदर्शन नव्हे तर mindset बदलणं देखील महत्त्वाचं आहे, असं मला जाणवलं.

"अभ्यास आणि शोध: MSME व्यवसायांसाठी मजबूत वित्तीय पायाभूत रचना"-

मी याचा सखोल अभ्यास केला आणि याचं तंत्रज्ञान, project finance आणि वास्तुशास्त्र या क्षेत्रांमध्ये उतरण्याचं ठरवलं. मी निर्णय घेतला की या व्यवसायांना एका मजबूत financial pillar ची गरज आहे, जो त्यांच्या growth चा आधार बनेल. फक्त आर्थिक मार्गदर्शन नव्हे तर mindset बदलणं देखील महत्त्वाचं आहे, असं मला जाणवलं. याच उद्देशाने 2024 मध्ये मी एक digital mentoring program सुरू केला. यामधून मी नवीन उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाच्या financial structure बद्दल शिकवतो, bank project finance, आणि growth चा मजबूत आधार कसा तयार करायचा, हे समजावतो. त्यातून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने, हा प्रकल्प योग्य दिशेने चालला आहे, याची खात्री पटली.

"Business Evolution Tribe (BET): MSME व्यवसायांसाठी एक सामर्थ्यशाली समुदाय"

यासोबतच मी "Business Evolution Tribe (BET)" नावाची एक digital community तयार करत आहे. ही community अशा उद्योजकांसाठी असेल जे आपल्या व्यवसायात growth आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी कटीबद्ध आहेत. BET हा केवळ एक गट नाही, तर एक असा चळवळ आहे ज्याचा उद्देश भारतातील MSME व्यवसायांना स्थिरता देऊन त्यांची प्रगती साधणं आहे.

"आध्यात्मिकता, सर्जनशीलता आणि सातत्यपूर्ण शिकण्याची ओढ"

माझ्या या प्रवासात तीन मुख्य तत्त्वं मला मार्गदर्शित करतात: आध्यात्मिकता, सर्जनशीलता, आणि आजीवन शिक्षण. मला आध्यात्मिकतेवर खूप श्रद्धा आहे, आणि त्यातूनच वास्तुशास्त्रासारख्या तत्त्वांबद्दल शिकण्याची आवड निर्माण झाली. माझ्या मते, व्यवसाय यश फक्त आर्थिकच नव्हे तर मानसिक, आध्यात्मिक, आणि शारीरिक वाढीसाठीही आवश्यक आहे. सर्जनशीलता मला नेहमी नवी दृष्टी देते, मग ती नवीन वित्तीय उपाय शोधण्याची असो किंवा नवीन digital tools वापरण्याची. मी पारंपरिक financial पद्धतींमध्ये आधुनिक digital तंत्रज्ञानाचं समन्वय साधत व्यवसाय finance अधिक सुलभ करण्याचं काम करतो.

"माझं स्वप्न: महाराष्ट्रातल्या MSMEs साठी प्रगतीचा एक मजबूत आधार"

माझा अंतिम ध्येय एक digital finance business school स्थापन करण्याचं आहे, जिथे उद्योजकांना financial pillar तयार करण्याचे महत्त्वाचे skills शिकता येतील, व्यवसायाची संरचना टिकवता येईल, आणि व्यवसाय finance चे जटिल मुद्दे सोप्या पद्धतीने समजता येतील. माझं स्वप्न आहे की भारतातील MSMEs ना मजबूत आर्थिक पायाभूत सुविधा मिळवून देणं, तंत्रज्ञान आत्मसात करण्यास प्रोत्साहन देणं, आणि आपल्या देशाच्या आर्थिक स्थिरतेला हातभार लावणं. मला खात्री आहे की व्यवसाय यशस्वी झाले तर समाजही प्रगत होईल, आणि माझं जीवनकार्य त्याच दृष्टीने मार्गदर्शक ठरेल.

"Oct 2016: Stepped away from a job to embrace the freedom to shape my own journey."

toddler's standing in front of beige concrete stair
toddler's standing in front of beige concrete stair
Free Webinar

Unlock strategies for sustainable business foundations and growth.

person holding ballpoint pen writing on notebook
person holding ballpoint pen writing on notebook
1:1 Session

Get personalized guidance for your business setup code.

MacBook Pro, white ceramic mug,and black smartphone on table
MacBook Pro, white ceramic mug,and black smartphone on table
two woman sits on sofa chairs inside house
two woman sits on sofa chairs inside house
Financial Control

Navigate your business journey with data-backed decisions.

Legacy Building

Establish a strong foundation for long-term business success.